पुणे डॉक्टर्स असोसिएशन प्रकाशित ‘तेजोमय पोटाचे आरोग्य ‘ या दिवाळी अंकास पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुणे श्री गुरु ष.ब्र.प्र.108 राष्ट्रसंत पद्मभास्कर डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज (मठाधिपती तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर ता.पाटण, जि.सातारा महाराष्ट्र) याच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा कराड येथे शनिवार दि.२० डिसेंबर रोजी संपन्न झाला. संस्थेच्या वतीने हा पुरस्कार संपादक डॉ. संतोष कवितके ,सहसंपादक डॉ. दिलीप मोरे व विक्रांत लाट्टे यांनी स्वीकारला. पुणे डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकारणी सदस्य व संपादक मंडळाची संपूर्ण टीम यांचे खूप खूप अभिनंदन.